चोरट्यांच्या टोळीकडून १०१ मोबाईल संच जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यांच्या टोळीकडून 
१०१ मोबाईल संच जप्त
चोरट्यांच्या टोळीकडून १०१ मोबाईल संच जप्त

चोरट्यांच्या टोळीकडून १०१ मोबाईल संच जप्त

sakal_logo
By

दौंड, ता. २४ : दौंड शहर व परिसरात चाकूचा धाक दाखवून मोबाईल संच चोरी करणाऱ्या टोळीकडून १४ लाख रुपये मूल्य असलेले १०१ मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. दौंडचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी शुक्रवारी (ता. २४) रात्री या बाबत माहिती दिली. दौंड-गोपाळवाडी रस्त्यालगत गणेश सोसायटी येथे चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरी करताना टोळीच्या सदस्यांपैकी सोमरा नगर मोदी (वय २६), आकाश दिलीप मोदी (वय २५), चंदन नगर मोदी (वय २२, तिघे रा. आमदा, जि. सराईकेला, झारखंड) व तीन अल्पवयीन मुले अशा एकूण सहा जणांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने पकडले. त्यांच्याकडून मोबाईल संचासह चाकू, सुरा आदी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01680 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top