दौंड - डॅा. दाते व शेख यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड  - डॅा. दाते व शेख यांची निवड
दौंड - डॅा. दाते व शेख यांची निवड

दौंड - डॅा. दाते व शेख यांची निवड

sakal_logo
By

रोटरी क्लब ऑफ दौंडच्या
अध्यक्षपदी डॉ. राजेश दाते

दौंड, ता. १५ : रोटरी क्लब ऑफ दौंडच्या अध्यक्षपदी डॉ. राजेश दाते तर सचिवपदी अमिर शेख यांची निवड करण्यात आली आहे. क्लबचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
दौंड शहरात पार पडलेल्या पदग्रहण समारंभात रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. राजेश दाते यांनी मावळत्या अध्यक्षा शालिनी पवार यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. अमीर शेख यांनी मावळत्या सचिव पायल भंडारी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. डिस्ट्रिक्टचे पंकज पटेल, मंगेश हांडे, सहायक प्रांतपाल गणेश काळभोर, निखिल मुथ्था, दौंड क्लबचे संस्थापक अध्यक्ष अविनाश हरहरे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष डॉ. राजेश दाते हे दौंड मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व क्लबचे माजी सचिव आहेत. नूतन सचिव अमिर शेख ग्रामविकास अधिकारी असून पंचायत राज विभागात राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. क्लबचे सन २०२२ - २०२३ साठीचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : सदस्य - डॉ. डी. एस. लोणकर, डॅा. मुकुंद भोर, शालिनी पवार, डॅा. फिलोमन पवार, पायल भंडारी, हरिश्चंद्र ठोंबरे, सुशील शहा, प्रज्ञा राजोपाध्ये, प्रफुल्ल भंडारी, मनोहर बोडखे, सुनील ढगे, सविता भोर, प्रशांत गुंजाळ, उल्हास मिसाळ, दीपक सोनवणे, नवनाथ गोरे, नीतेश पोकार.
-----
फोटो ः 01822, 01823

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01691 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..