दौंड तालुक्यात बाजारांत गहू २९११ रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात बाजारांत 
गहू २९११ रुपये क्विंटल
दौंड तालुक्यात बाजारांत गहू २९११ रुपये क्विंटल

दौंड तालुक्यात बाजारांत गहू २९११ रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. २२ : दौंड तालुक्यात गव्हाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. गव्हाची ४४५ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान १९०० रुपये; तर कमाल २९११ बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ४७४ क्विंटल आवक होऊन त्यास किमान १८०० व कमाल २८५१ रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. तर भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक घटली असून बाजारभाव तेजीत आहे. कांद्याची ४१०० क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १९०० रुपये बाजारभाव मिळाला. लिंबाच्या १२५ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान २०१; तर कमाल ६०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.
फ्लॉवरची ५३० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान २०० रुपये; तर कमाल ३५० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ६०० आणि मेथीस शेकडा किमान ८०० व कमाल १२०० रुपये, असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो- २००, वांगी- ३००, दोडका- ३००, भेंडी- ३५०, कारली- ३००, हिरवी मिरची- २५०, गवार- ७००, भोपळा- ७५, काकडी- १००, शिमला मिरची- ४००, कोबी- २००. ------

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01694 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..