
दौंड सोसायटीच्या इमारतीचे भूमिपूजन
दौंड, ता. २७ : लिंगाळी (ता. दौंड) येथे दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या इमारतीची एक कोटी ३८ लाख रुपये खर्च करून उभारणी केली जाणार आहे.
येथील दौंड शुगर लिमिटेड रोडलगत इमारतीचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल जगदाळे व त्यांच्या पत्नी डॅा. संगीता जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटची १९६० मध्ये स्थापना झाली असून, संस्थेने बारा गुंठे जागा विकत घेतली असून सुमारे दहा हजार चौरस फुटाचे बांधकाम केले जाणार आहे. इमारतीमध्ये संस्था कार्यालय, मीटिंग हॅाल, सांस्कृतिक हॅाल आणि व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम प्रस्तावित आहे.
भूमिपूजन नंतर पुणे जिल्हा परिषद व दौंड पंचायत समितीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना फळझाडांची रोपे वितरित करण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, सोसायटीचे अध्यक्ष सुहास जगदाळे, उपाध्यक्ष धोंडिबा मेरगळ, बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे, सरपंच सुनील जगदाळे, उपसरपंच वैजयंता चितारे, सोसायटीचे संचालक इंद्रजित जगदाळे, जालिंदर जगदाळे, बाळासाहेब लोंढे, राजू मेरगळ, महेश नांदखिले, संजय आढाव, दिलीप येडे, नवनाथ गावडे, अलका काटे, वैशाली जगदाळे, रावा पडळकर, राजू जगदाळे यांच्यासह उमेश जगदाळे उपस्थित होते.
01842
Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01703 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..