दौंडमध्ये ७०० किलो गोमांस जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये ७०० किलो गोमांस जप्त
दौंडमध्ये ७०० किलो गोमांस जप्त

दौंडमध्ये ७०० किलो गोमांस जप्त

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७०० किलो गोमांस जप्त केले असून, कत्तलीसाठी आणलेल्या ७ गायींची सजग नागरिक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे सुटका झाली. या कारवाईत एक वाहनचालक आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली.
दौंड पोलिसांनी रविवारी (ता. ७) याबाबत माहिती दिली. प्रभारी पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांना दौंड शहरातील इदगाह मैदानावळ एका हॅालच्या भिंतीला लागून ७ गायी कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत दौंड पोलिसांना कारवाईचे निर्देश दिल्यानंतर फौजदार सुनीता चवरे या घटनास्थळी पोलिस पथकासह दाखल झाल्या. त्यांनी केलेल्या कारवाईत ७०० किलो गोमांस आणि गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मोटार जप्त केल्या. कारवाईत वाहनचालक किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, माळशिरस, जि. सोलापूर) याला अटक केली असून, त्याचे अन्य तीन साथीदार पळून गेले.
या प्रकरणी पोलिस नाईक अमिर शेख यांच्या फिर्यादीनुसार इद्रिस आबिद कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड), किरण पांडुरंग कुंभार (रा. शिंदेवाडी, माळशिरस), बबलू कुरेशी व मुश्रीफ कुरेशी (दोघे रा. बारामती) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इद्रिस कुरेशी याच्यावर गोहत्या व गोमांस वाहतूक प्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार पांडुरंग थोरात, अंमलदार महिंद्र लोहार, विकास गावडे, अमिर शेख, निखिल जाधव, योगेश गोलांडे व रवी काळे यांनी या कारवाईत भाग घेतला. दौंड पोलिसांनी सदर सात गायींची तालुक्यातील एका गोशाळेत रवानगी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01714 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..