दौंडला धावण्याच्या स्पर्धेत पोलिस नाईक शेख अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला धावण्याच्या स्पर्धेत पोलिस नाईक  शेख अव्वल
दौंडला धावण्याच्या स्पर्धेत पोलिस नाईक शेख अव्वल

दौंडला धावण्याच्या स्पर्धेत पोलिस नाईक शेख अव्वल

sakal_logo
By

दौंड, ता. १४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलिस बांधवांसाठी घेण्यात आलेल्या १० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत दौंड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अमिर शेख यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे व यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत गोपाळवाडी (ता. दौंड) हद्दीतील बोरावकेनगर येथून या स्पर्धेला झेंडा दाखविण्यात आला. बोरावकेनगर ते लिंगाळी ग्रामपंचायतमार्गे आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखाना या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. दौंड व यवत पोलिस ठाणे आणि दौंड उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील ५ अधिकारी व ४५ अंमलदार यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेत गुणानुक्रमे अमिर शेख (३८ मिनीट), कॅान्स्टेबल संदीप जाधव (३९ मिनीट) व हवालदार सुभाष डोईफोडे (४० मिनीट) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. विजेत्यांना ज्येष्ठ ह्रदयरोगतज्ज्ञ डॅा. डी. एस. लोणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
-----
01864

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01718 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..