दौंड तालुक्यात हरभऱ्याची ७८ क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात हरभऱ्याची
७८ क्विंटल आवक
दौंड तालुक्यात हरभऱ्याची ७८ क्विंटल आवक

दौंड तालुक्यात हरभऱ्याची ७८ क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता. १७ : दौंड तालुक्यात हरभऱ्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. हरभऱ्याची ७८ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ३८०० रुपये; तर कमाल ४७०० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची ५१ क्विंटल आवक झाली होती.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य बाजारात भाजीपाला व भुसार मालाची आवक व बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक घटली असून बाजारभाव तेजीत आहे. कांद्याची १६०० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १६०० रुपये बाजारभाव मिळाला. लिंबाच्या ११९ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान ४०० तर कमाल १३०० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ७०० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल २५० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ६५० आणि मेथीस शेकडा किमान ५०० व कमाल १२०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १५०, वांगी - ४५०, दोडका - ७००, भेंडी - ४००, कारली- ४५०, हिरवी मिरची - ३००, गवार - ८००, भोपळा - १००, काकडी - १५०, शिमला मिरची - ४५०, कोबी - ३००.

शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू .) कमाल (रू .)
गहू ४११ १९५० २८०१
बाजरी २८९ १८०० २८००
ज्वारी २०० १६५० ३०००
मूग ००५ ५००० ६५००
चवळी ००४ ५५०० ६५००
मका ०१९ २००० २६५०

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01725 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..