दौंडला मूग ६७०० रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला मूग ६७०० रुपये क्विंटल
दौंडला मूग ६७०० रुपये क्विंटल

दौंडला मूग ६७०० रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. २४ : केडगाव (ता. दौंड) येथील उपबाजारात नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. मुगाची १४५ क्विंटल आवक होऊन, त्यास प्रतवारीनुसार किमान ५००० रुपये; तर कमाल ६७०० बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात भाजीपाला व भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक व बाजारभावात वाढ आहे. कांद्याची ३४०० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये तर कमाल १९०० रुपये बाजारभाव मिळाला. लिंबाच्या १४६ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान ४५१ तर कमाल ११९१ रुपये असा बाजारभाव मिळाला.
फ्लॉवरची ८५० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १०० तर कमाल ३०० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ५०० रुपये तर कमाल १२०० आणि मेथीस शेकडा किमान १००० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक ( क्विंटल ) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ४०८ २००० ३००१
बाजरी ३०३ २००० ३०००
ज्वारी १८३ १६७५ ३००१
हरभरा ०९८ ३५०० ४६५१
मका ०१० २००० २६५०

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १५०, वांगी - ५०० , दोडका - ५०० , भेंडी - ३०० , कार्ली - ४५० , हिरवी मिरची - ४००, गवार - १०००, भोपळा - १२५ , काकडी - १५० , शिमला मिरची - ३०० , कोबी - १५०.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01733 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..