केडगावात मुगाची ८९० क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडगावात मुगाची ८९० क्विंटल आवक
केडगावात मुगाची ८९० क्विंटल आवक

केडगावात मुगाची ८९० क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता. १ : केडगाव (ता. दौंड) उपबाजारात नवीन मुगाची ८९० क्विंटल आवक झाली आहे. मुगास प्रतवारीनुसार किमान ५००० रुपये; तर कमाल ७००० बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात मुगाची १४५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ५००० रुपये; तर कमाल ६७०० बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे तर भुसार मालाची आवक घटली असून बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ आहे. कांद्याची ६८०० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० रुपये ; तर कमाल १८०० रुपये बाजारभाव मिळाला. लिंबाच्या १४४ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान ४०० तर कमाल १२७० रुपये असा बाजारभाव मिळाला.
फ्लॉवरची ५७० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान २०० ; तर कमाल ५०० रूपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ७०० रुपये, तर कमाल १७०० आणि मेथीस शेकडा किमान ०८०० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४७२ २००० २७५०
ज्वारी २१६ १६७५ २८५१
बाजरी ४३१ २०५० २७५१
हरभरा ०९७ ३५०० ४५००
मका ०२९ २००० २६००

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे : (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १००, वांगी - ३००, दोडका - ४३०, भेंडी - ३००, कार्ली - ४००, हिरवी मिरची - ४००, गवार - ६००, भोपळा - ०७५ , काकडी - १५०, शिमला मिरची - २५०, कोबी - १५०.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01742 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..