सलग दोन वर्षे ८५२ विद्यार्थी धान्यापासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग दोन वर्षे ८५२ विद्यार्थी धान्यापासून वंचित
सलग दोन वर्षे ८५२ विद्यार्थी धान्यापासून वंचित

सलग दोन वर्षे ८५२ विद्यार्थी धान्यापासून वंचित

sakal_logo
By

दौंड, ता. ३ : दौंड तालुक्यातील वसतिगृह व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील ८५२ विद्यार्थी धान्यापासून वंचित आहेत.
दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती विकास कदम यांनी एका निवेदनाद्वारे योजना पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. शासनाकडून कल्याणकारी संस्था व वसतिगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ दिले जात होते. दौंड तालुक्यात ११ वसतिगृह व आश्रमशाळेत एकूण ८५२ विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यास महिन्याला गहू व तांदूळ सवलतीच्या दरात दिले जातात. यापूर्वी संबंधित संस्थेकडून शासकीय चलनाद्वारे रक्कम भरून शासकीय गोदामातून धान्य उचलले जात होते. आधार कार्डशी संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (एईपीडीएस) नोंदणी झालेल्या कल्याणकारी संस्थांना इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (ई - पीओएस) यंत्राद्वारे धान्य देण्याचा निर्णय झाल्याने संस्थांना या यंत्राद्वारे धान्य घेण्याची सक्ती करण्यात आली. परंतु नवीन यंत्र न देता वापरलेले यंत्र दिल्याने धान्य मिळण्यास अडचणी आल्या. वसतिगृहाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची आधार व अन्य माहिती संबंधितांकडे जमा करूनही विविध कारणे देत धान्य देण्यात आले नाही.
ई - पीओएसद्वारे ऑनलाइन पद्धतीने धान्य वितरणात त्रुटी असल्याने ऑफलाइन पद्धतीने चलन भरून घेत धान्य देण्याची मागणी करूनही त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. याबाबत पाठपुरावा करून देखील त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत सदर योजना पूर्ववत करण्यास टाळाटाळ करून दलित, मागासवर्गीय व भटक्या जाती- जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे या अन्यायाच्या निषेधार्थ दौंड तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन उभारण्याचा इशारा विकास कदम यांनी निवेदनात नमूद केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर
दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाने एईपीडीएस नोंदणीशिवाय धान्य न देण्याची सूचना केली आहे. तहसील कार्यालयाने ८ ऑगस्ट रोजी यासंबंधी प्रस्ताव पाठविला असून त्यास मंजुरी मिळताच धान्य दिले जाईल, असे सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01746 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..