मटका जुगार प्रकरणी दौंडमध्ये चौघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मटका जुगार प्रकरणी 
दौंडमध्ये चौघांवर गुन्हा
मटका जुगार प्रकरणी दौंडमध्ये चौघांवर गुन्हा

मटका जुगार प्रकरणी दौंडमध्ये चौघांवर गुन्हा

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड शहरात मुख्य रस्त्यालगत असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रेल्वेच्या जागेत हा जुगार अड्डा सुरू होता.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, शहरातील कुरकुंभ मोरीजवळ आयना लॅाटरी सेंटर येथे छापा टाकून मटका जुगारासाठी आकडे घेणारा प्रकाश पाटसकर (वय ६९, रा. गांधी चौक, दौंड), शब्बीर हुसेन शेख (वय ६४, रा. गोवा गल्ली, दौंड), सुधीर सदाशिव चिपळूणकर (वय ७०, रा. बंगला साइड, दौंड) व बबन आबाजी आढाव (वय ५८, रा, सिंधी गल्ली रस्ता, दौंड) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. पोलिस अंमलदार अमोल देवकाते यांनी याबाबत फिर्याद दिली.
दरम्यान, पोलिसांनी कुरकुंभ मोरीजवळील अड्ड्यावर कारवाई केली असली, तरी शहरातील पोलिस ठाण्यासमोरील परिसर, सहकार चौक, शालीमार चौक, गोपाळवाडी रस्ता, आदी ठिकाणी रस्त्यालगत सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर कारवाई टाळली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01752 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..