दौंड तालुक्यात १५९ टक्के पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड तालुक्यात 
१५९ टक्के पाऊस
दौंड तालुक्यात १५९ टक्के पाऊस

दौंड तालुक्यात १५९ टक्के पाऊस

sakal_logo
By

दौंड, ता. ८ : दौंड तालुक्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरीच्या १५८.९० टक्के पाऊस झाला आहे. दौंड तालुक्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी २१४.२० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा या तीन महिन्यात एकूण ३४०.३० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दौंड तालुक्यात गणपती आगमनाच्या दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा कडक उन्हाचा चटका आणि संध्याकाळी जोरदार पाऊस, असे सत्र सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी तालुक्यात काही ठिकाणी तरकारी व फूल शेतीचे नुकसान झाले आहे. तालुक्यात १ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ११५. ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01755 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..