दौंडला कोथिंबीर शेकडा २५०० रुपये मुख्य बाजारात आवक घटल्याने बाजारभावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला कोथिंबीर शेकडा २५०० रुपये
मुख्य बाजारात आवक घटल्याने बाजारभावात वाढ
दौंडला कोथिंबीर शेकडा २५०० रुपये मुख्य बाजारात आवक घटल्याने बाजारभावात वाढ

दौंडला कोथिंबीर शेकडा २५०० रुपये मुख्य बाजारात आवक घटल्याने बाजारभावात वाढ

sakal_logo
By

दौंड, ता. २१ : दौंड तालुक्यातील कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. कोथिंबिरीच्या १०२५० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० रुपये, तर कमाल २५०० बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कोथिंबिरीच्या १३५६० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० तर कमाल १२०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे तर भुसार मालाची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ आहे. कांद्याची ४४०५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार किमान २५० रुपये; तर कमाल १७०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

लिंबाच्या ८१ डागांची आवक झाली असून, त्यास प्रतिडाग किमान ८५० तर कमाल १५५० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ६३० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल ३०० रुपये भाव मिळाला आहे. मेथीस शेकडा किमान १००० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु) कमाल (रु)
गहू ४३२ १९०० २६७५
ज्वारी १३२ १८०० ३१००
बाजरी २७७ १८०० २५००
मूग १०२ ४८५० ७४६५
हरभरा ०६० ३५०० ४४००
मका ०१० १८५० २५६१
उडीद ०४१ ५८०० ६७०१

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) :
टोमॅटो - १२५, वांगी - ४००, दोडका - ५००, भेंडी - २५०, कारले - ३००, हिरवी मिरची - ४००, गवार - १०००, भोपळा - १००, काकडी - १५०, शिमला मिरची - २५०, कोबी - १५०.

गवार महाग
पितृपक्ष पंधरवड्यात पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. गवारीची ४४ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ४०० तर कमाल १००० रुपये असा दर मिळाला आहे. मागील आठवड्यात गवारीची ४२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४५० रुपये दर मिळाला होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01766 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..