दौंड पोलिसांनी केली सहा गायींची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड पोलिसांनी केली 
सहा गायींची सुटका
दौंड पोलिसांनी केली सहा गायींची सुटका

दौंड पोलिसांनी केली सहा गायींची सुटका

sakal_logo
By

दौंड, ता. २१ : दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची पोलिसांनी सुटका केली. एक ते तीन दरम्यान वय असलेल्या या गायींना चारा व पाणी न देता बांधले होते.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, शहरातील खाटीक गल्ली येथे भीमा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सहा गायींना बांधण्यात आले होते. कत्तलीसाठी आणलेल्या या गायींविषयी माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन गायींची सुटका करून गोशाळेत रवानगी केली. गुरांना होणाऱ्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरांचे लसीकरण सुरू असताना खाटीक गल्लीत या गायींसाठी चारा, पाणी व औषधोपचाराची कोणतीही सोय न करता बांधण्यात आले होते. याबाबत पोलिस अंमलदार रवींद्र काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक निरीक्षक तुकाराम राठोड यांच्यासह सहायक फौजदार बबन जाधव, हवालदार विकास गावडे, नाईक अमीर शेख, विशाल जावळे यांनी या कारवाईत भाग घेतला.
दरम्यान, दौंड पोलिसांनी ७ ऑगस्ट रोजी याच परिसरात केलेल्या कारवाईत ७ गायींची सुटका करीत ७०० किलो गोमांस जप्त केले होते. तर, २९ ऑगस्ट रोजी एका गाईची सुटका केली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01767 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..