दौंडमध्ये उद्यापासून पोलिस क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये उद्यापासून पोलिस क्रीडा स्पर्धा
दौंडमध्ये उद्यापासून पोलिस क्रीडा स्पर्धा

दौंडमध्ये उद्यापासून पोलिस क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

दौंड, ता. १२ : दौंड शहरात शुक्रवारपासून (ता. १४) महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाच्या क्रीडा स्पर्धेस सुरुवात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन गट क्रमांक सातवरील मैदानावर होणार आहे. स्पर्धेत १२५९ पोलिस अधिकारी व अंमलदार सहभागी होणार आहेत.
दौंड येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक वसंत परदेशी यांनी याबाबत माहिती दिली. स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केट बॉल, हॅण्ड बॉल, कबड्डी , खो - खो, कुस्ती, ज्युदो, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, स्वीमिंग, क्रॉस कंट्री, अॅथलेटिक्स, तायक्वांदो आणि वुशु या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. १९ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. नागरिकांसाठी स्पर्धाच्या नियमांचे पालन करून पाहण्यासाठी यावे.