दौंडमध्ये शिपायावर विनयभंगप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये शिपायावर
विनयभंगप्रकरणी गुन्हा
दौंडमध्ये शिपायावर विनयभंगप्रकरणी गुन्हा

दौंडमध्ये शिपायावर विनयभंगप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

दौंड, ता. १५ : दौंड पंचायत समितीच्या एका शिपायाविरूध्द विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, पंचायत समितीमधील शिपाई विकास कवळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या फिर्यादी महिलेशी तोंडओळख असल्याने विकास याने महिलेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॅाट्सअपवरून अश्लील संदेश पाठविले. त्यानंतर कॅाल करून, ‘तुम्ही खूप छान दिसता, मी तुम्हाला बाहेर फिरवायला नेऊ का?’ आदी संभाषण केले होते, असे फिर्यादीत नमूद केले. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड या प्रकरणी तपास करीत आहेत.