दौंडमध्ये पोलिसाच्या घरातून १० लाखांच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये पोलिसाच्या घरातून
१० लाखांच्या दागिन्यांची चोरी
दौंडमध्ये पोलिसाच्या घरातून १० लाखांच्या दागिन्यांची चोरी

दौंडमध्ये पोलिसाच्या घरातून १० लाखांच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

दौंड, ता. १७ : दौंड शहरात भरवस्तीत असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील पोलिसाच्या घरात झालेल्या घरफोडीत १० लाख ७२ हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरीस गेले.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, दौंड शहरातील इरिगेशन कॅालनीमध्ये राज्य राखीव पोलिस दलातील पोलिस महेश व त्यांचे बंधू तथा जलसंपदा विभागात कर्मचारी योगेश रणसिंग हे राहावयास आहेत. १४ ऑक्टोबर रोजी रणसिंग कुटुंबीय हे एका डोहाळे जेवणासाठी गेले असता रात्री ८ ते ८ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी पाठीमागील बाजूच्या स्नानगृहाच्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला. घरातील दिवाणमध्ये स्टील डब्ब्यांमध्ये ठेवलेले सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, अंगठ्या, गंठण, राणीहार, बोरमाळ, कर्णफुले, नथ, चांदीचे ताट, आदी एकूण १० लाख ७२ हजार २०० रुपयांचे दागिने चोरीस गेले आहेत, असे प्रिया महेश रणसिंग यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले.