Mon, Feb 6, 2023

देऊळगाव राजे येथे
१२८ मि.मी. पाऊस
देऊळगाव राजे येथे १२८ मि.मी. पाऊस
Published on : 18 October 2022, 2:39 am
दौंड, ता. १८ : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे सोमवारी (ता. १८) १२८ मि.मी. पावसाची नोंद झाली. दौंड तालुक्यात सोमवारी (ता. १७) झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे : देऊळगाव राजे- १२८, केडगाव- १००, पाटस- ८३, रावणगाव- ७४, वरवंड- ७२, यवत- ६७, राहू- ६४, दौंड- ५३. दौंड नगरपालिकेकडून भुयारी गटार योजनांतर्गत चेंबरची नियमित सफाई न केल्याने अनेक भागांमध्ये सांडपाणी तुंबले होते. नगरपालिकेच्या चेंबरमधील गाळ उपसण्यासाठीचे जेंटिंग आणि सक्शन यंत्रे नादुरूस्त असल्याने शहरात नागरिकांच्या घरांमध्ये मंगळवारी सांडपाणी परत आल्याने दुर्गंधी पसरलेली आहे.