लाचखोर डॅाक्टरच्या घरातून एक लाखाचा मद्यसाठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोर डॅाक्टरच्या घरातून
एक लाखाचा मद्यसाठा जप्त
लाचखोर डॅाक्टरच्या घरातून एक लाखाचा मद्यसाठा जप्त

लाचखोर डॅाक्टरच्या घरातून एक लाखाचा मद्यसाठा जप्त

sakal_logo
By

दौंड, ता. २१ : दौंड उपजिल्हा रुग्णालयात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्या म्हाळुंगे (ता. मुळशी) येथील सदनिकेतून एक लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दौंड उपजिल्हा रुग्णालयातून विवाह नोंदणीचे दुबार प्रमाणपत्र देण्यासाठी शहरातील एका तरुणाकडून १७ ऑक्टोबर रोजी तत्कालीन अधीक्षक डॉ. डांगे (वय ४६) यांनी तीन हजार आणि शिपाई नानासाहेब पांडुरंग खोत (वय ५७) याने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनंतर डॉ. डांगे यांच्या म्हाळुंगे येथील ‘इन्सिया हाइट्स’ या इमारतीमधील सदनिकेची झडती घेण्यात आली. त्यात विदेशी मद्याच्या ४४ बाटल्यांचा एकूण १ लाख २ हजार ४०० रुपये मूल्य असलेला साठा जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक तानाजी शिंदे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे येथील ‘ड’ विभागाने विहित मर्यादेपेक्षा अधिक मद्यसाठा केल्याप्रकरणी डॉ. डांगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

येरवडा कारागृहात रवानगी
लाचखोर डॉ. डांगे व शिपाई खोत यांच्या दोन दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाच्या आदेशाने दोघांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक वीरनाथ माने यांनी शुक्रवारी (ता. २१) दिली.