दौंड येथे बाजरीच्या बाजारभावात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड येथे बाजरीच्या बाजारभावात वाढ
दौंड येथे बाजरीच्या बाजारभावात वाढ

दौंड येथे बाजरीच्या बाजारभावात वाढ

sakal_logo
By

दौंड, ता. २५ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक घटली. परंतु बाजारभावात तिनशे रुपयांनी वाढ झाली आहे. बाजरीची २२७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १८००, तर कमाल ३२०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात बाजरीची ३१० क्विंटल आवक होऊन त्यास किमान १५०० तर कमाल २९०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहेत. भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत आहेत. उपबाजारात कांद्याची एकूण ३५६० क्विंटल आवक झाली असून त्यास किमान ६०० तर कमाल ३०० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
कोथिंबिरीची ११,९८० जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल १००० रुपये बाजारभाव मिळाला. मेथीची २१३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - ३००, वांगी - ५००, दोडका - ४००, भेंडी - १५०, कार्ली - ३००, हिरवी मिरची - ३५०, गवार - ८००, भोपळा - २००, काकडी-१५०, शिमला मिरची-५००, कोबी - २००.

मिरचीची आवक वाढली पण बाजारभावात घट
दौंड तालुक्यात हिरवी मिरचीची ८० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो किमान २५० तर कमाल ३५० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो किमान २५० तर कमाल ४०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता. सिमला मिरचीची ४० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो किमान २०० तर कमाल ५०० रुपये बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू २८५ २००० ३०००
ज्वारी ०३७ २२०१ ३४००
मूग ००६ ५००० ६५००
हरभरा ०३२ ३४५० ४३००
मका ०७८ २००० २३५०
उडीद ०६८ ४००० ६०००