सत्तार यांचा राजीनामा घ्या : वैशाली नागवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तार यांचा राजीनामा
घ्या : वैशाली नागवडे
सत्तार यांचा राजीनामा घ्या : वैशाली नागवडे

सत्तार यांचा राजीनामा घ्या : वैशाली नागवडे

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी केली.
सत्तार यांनी सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसने संताप व्यक्त करीत त्या विधानाचा निषेध केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांचा तत्काळ राजीनामा न घेतल्यास आम्ही सत्तार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा नागवडे यांनी दिला. त्या म्हणाल्या, ‘‘हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे व या महाराष्ट्रात महिला भगिनींचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही.’’