गुन्हा दाखल करण्याची दौंड राष्ट्रवादीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हा दाखल करण्याची
दौंड राष्ट्रवादीची मागणी
गुन्हा दाखल करण्याची दौंड राष्ट्रवादीची मागणी

गुन्हा दाखल करण्याची दौंड राष्ट्रवादीची मागणी

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरून समाजात महिलांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधी विभागाने केली आहे. दौंड पोलिसांकडे एका अर्जाद्वारे ही मागणी केली. सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करून महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी या विधानाच्या माध्यमातून समाजामध्ये द्वेषाची भावना, तेढ आणि वैमनस्य निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वकरित्या केल्याचे अर्जात नमूद केले आहे. विधी विभागाचे शहराध्यक्ष अॅड. सुरेश जाधव, ज्येष्ठ नोटरी अजित बलदोटा, अॅड. संदीप येडे, अॅड. राहुल धावडे, अॅड. सचिन शिंदे यांच्यासह काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.