दौंड शहरामध्ये प्रतिमेला जोडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड शहरामध्ये प्रतिमेला जोडे
दौंड शहरामध्ये प्रतिमेला जोडे

दौंड शहरामध्ये प्रतिमेला जोडे

sakal_logo
By

दोंड, ता. ८ : खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरून, समाजात महिलांबाबत आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला दौंड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडे मारण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (ता. ८) पक्षाच्या वतीने सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारल्यानंतर प्रतिमेचे दहन करण्यात आले. या वेळी दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांच्यासह वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, अप्पासाहेब पवार, हेमलता फडके, राजेंद्र खटी, डॉ. वंदना मोहिते, बादशहा शेख, ज्योती राऊत, हरेश ओझा, आदी या वेळी उपस्थित होते. सुळे यांच्यावर टीका करून महिलांचा अपमान केल्याप्रकरणी सत्तार यांचा या वेळी तीव्र शब्दांत घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंबंधी मागणी करणारे एक निवेदन पक्षाच्या वतीने या वेळी दौंड पोलिसांना देण्यात आले.