दौंडमधील बसथांब्यांसाठी शासकीय जागांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील बसथांब्यांसाठी 
शासकीय जागांची मागणी
दौंडमधील बसथांब्यांसाठी शासकीय जागांची मागणी

दौंडमधील बसथांब्यांसाठी शासकीय जागांची मागणी

sakal_logo
By

दौंड, ता. १२ : दौंड शहरातील दोन बसथांब्यांसाठी शासकीय जागा भाडेकराराने घेऊन प्रवाशांकरिता बस थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे.
एसटी महामंडळाच्या पुणे येथील विभागीय नियंत्रकांकडे आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. दौंड-कुरकुंभ रस्त्यावरील ‘गोलराउंड’ या नावाने परिचित असलेल्या भागात गोकूळ हॅाटेल’च्या दिशेने जाणाऱ्या वळणावरील चढावर लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबतात. त्यामुळे प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गावरच थांबावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेली राज्य राखीव पोलिस दलाची विनावापर जागा घेऊन तेथे बस थांबा करावा. तसेच, नगर मोरी चौकात थांबा नसल्याने प्रवाशांना महामार्गावरच थांबावे लागत असल्याने तेथे महसूल खात्याची विनावापर जागा दीर्घ मुदतीच्या करारावर घ्यावी. तसेच, शहरातील काळूबाई मंदिराशेजारील एसटी पिकअप शेडचे रखडलेले काम पूर्ण करावे, अशा मागण्या केल्या आहेत, असे आपचे शहर व तालुका संयोजक रवींद्र जाधव यांनी सांगितले.