दौंड हल्ला प्रकरणातील तीन संशयितांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड हल्ला प्रकरणातील
तीन संशयितांना अटक
दौंड हल्ला प्रकरणातील तीन संशयितांना अटक

दौंड हल्ला प्रकरणातील तीन संशयितांना अटक

sakal_logo
By

दौंड, ता. १९ : दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना लोणावळा येथून ताब्यात घेतले आहे. मात्र, गुन्हा दाखल झालेला दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख मागील ११ दिवसांपासून फरारी आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती दिली की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने इलियास इस्माईल शेख (वय ३१), वाहिद जावेद खान (वय २१) व सुफियान ऊर्फ जुम्मा रमझान शेख (वय २०, तिघेही रा. कुंभार गल्ली, दौंड) या तिघांना ताब्यात घेतले. तिघेही मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने त्यांना लोणावळ्यात ताब्यात घेऊन दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले. एकूण वीस आरोपींपैकी यापूर्वी जिलानी शेख या संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याने आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. फरारी संशयित आरोपी बादशहा शेख व अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.