दौंडमध्ये पाचशेच्या ५३ बनावट नोटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये पाचशेच्या ५३ बनावट नोटा
दौंडमध्ये पाचशेच्या ५३ बनावट नोटा

दौंडमध्ये पाचशेच्या ५३ बनावट नोटा

sakal_logo
By

दौंड, ता. २२ : दौंड येथील एचडीएफसी बॅंक शाखेच्या यंत्रात रोख भरणा करताना पाचशे रुपयांच्या ५३ बनावट नोटा आढळून आल्या.
दौंड पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) याबाबत माहिती दिली की, शहाजी कापसे यांनी त्यांच्या पत्नी अश्विनी कापसे (रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) यांच्या बॅंक खात्यात रोकड भरताना हा प्रकार उघड झाला. शहरातील एचडीएफसी बॅंक शाखेतील कॅश डिपॅाझिट यंत्रात १९ नोव्हेंबर रोजी शहाजी कापसे यांनी २७ हजार रुपयांचा भरणा केला. परंतु, रोकड भरल्यानंतर मोबाईल क्रमांकावर त्याबाबतचा एसएमएस न आल्याने त्यांनी बॅंक व्यवस्थापकांकडे चौकशी केली. बॅंक प्रशासनाने यंत्र उघडून पाहणी केली असता त्यामध्ये भरणा केलेल्या पाचशेच्या ५४ नोटांपैकी ५३ नोटा बनावट असल्याचे आढळून आल्या. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी एचडीएफसी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक अनुप भोसले यांच्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला. एका अज्ञाताने कापसे यांना या ५३ नोटा दिल्याचे फिर्यादीत नमूद केले.
सदर बनावट नोटा कापसे यांना कोणी व का दिल्या, हे तपासात निष्पन्न होईल, अशी माहिती तपास अधिकारी तथा फौजदार सुनीता चवरे यांनी दिली.
दरम्यान, बनावट नोटा तयार करून त्याचे वितरण करणारी टोळी दौंड शहर व तालुक्यात पुन्हा सक्रिय झाल्याने दुकानदारांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.