दौंडमध्ये ज्वारी ४५०१ रुपये क्विंटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये ज्वारी ४५०१ रुपये क्विंटल
दौंडमध्ये ज्वारी ४५०१ रुपये क्विंटल

दौंडमध्ये ज्वारी ४५०१ रुपये क्विंटल

sakal_logo
By

दौंड, ता. २४ : दौंड तालुक्यात ज्वारीची एकूण १६८ क्विंटल आवक झाली आहे. ज्वारीस किमान ३००० तर कमाल ४५०१ रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात ९७ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २९०० तर कमाल ४२०० रुपये बाजारभाव मिळाला होता.

कांद्याची दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभाव घट झाली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ४८५० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २५० तर कमाल २२०० रुपये असा बाजारभाव मिळाला. लिंबाच्या ९१ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान २०१ तर कमाल ४५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ८०० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला आहे.
कोथिंबिरीची १८,५९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान कमाल ३०० रुपये असा भाव मिळाला. मेथीची २७३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १५०० व कमाल २००० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ४२९ २२०० ३२००
बाजरी ४७८ १७०० ३२११
मूग ०२७ ६००० ६७०१
हरभरा ०६० ३६५० ४८००
मका ३१६ १६०० २२००
उडीद ०२८ ५००० ६१००

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - १००, वांगी-४००, दोडका-२५०, भेंडी -२००, कार्ली-३५०, हिरवी मिरची-३००, गवार-७००, भोपळा-१००, काकडी-२००, शिमला मिरची-४००, कोबी-१००.
------
कोबी व भोपळ्याच्या दरात घट
कोबीची ६५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान ८० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कोबीची ६० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता कमाल १८० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता. भोपळ्याची ५६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान ५० तर कमाल १०० रुपये बाजारभाव मिळाला. .