पोटगी मागितल्यावरून विभक्त पत्नीला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोटगी मागितल्यावरून 
विभक्त पत्नीला मारहाण
पोटगी मागितल्यावरून विभक्त पत्नीला मारहाण

पोटगी मागितल्यावरून विभक्त पत्नीला मारहाण

sakal_logo
By

दौंड, ता. २ : विभक्त राहणाऱ्या पत्नीला भररस्त्यात मारहाण केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी विशाल महेंद्र पाळेकर (रा. पोस्ट ऑफिसजवळ, सिद्धार्थनगर, दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशाल याची विभक्त राहणारी पत्नी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी त्याने तिला फॅारेस्ट ऑफिसजवळ अडवून काठीने बेदम मारहाण केली. पत्नीने पोटगीचा दावा दाखल केल्याच्या रागातून त्याने शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. या प्रकरणी श्रुती पाळेकर हिच्या फिर्यादीनुसार, विशाल याच्याविरुद्ध दुखापत करणे, धाकदपटशा करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विशाल याच्याविरुद्ध यापूर्वी मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.