दौंडमध्ये हरभऱ्याची ५९ क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये हरभऱ्याची ५९ क्विंटल आवक
दौंडमध्ये हरभऱ्याची ५९ क्विंटल आवक

दौंडमध्ये हरभऱ्याची ५९ क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात हरभऱ्याची एकूण ५९ क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान ३८५० तर कमाल ५००० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ३१ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ३७०० तर कमाल ४५०० रुपये बाजारभाव मिळाला होता.

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभावात मोठी घट झाली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ३१०० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० तर कमाल २००० रुपये असा बाजारभाव मिळाला. लिंबाच्या २५१ डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान १०० तर कमाल २५१ रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची १२५० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान ५०; तर कमाल ६० रुपये दर मिळाला आहे.
कोथिंबिरीची १८१५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ६८२० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० व कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो-०७५, वांगी-१००, दोडका-२००, भेंडी- ००, कार्ली-२००, हिरवी मिरची-३००, गवार-८००, भोपळा-०७०, काकडी-१५०, शिमला मिरची-२५०, कोबी-०७०.

भेंडी व गवारच्या दरात वाढ.
दौंड तालुक्यात भेंडीची ५६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान २०० तर कमाल ४०० रुपये बाजारभाव मिळाला. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान ४०० तर कमाल ८०० रुपये बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात गवारीची २८ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान २०० तर कमाल ७०० रुपये, असा बाजारभाव मिळाला होता.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू) कमाल (रू)
गहू ३७३ २२५० ३२५१
ज्वारी १९४ २४५० ४००१
बाजरी ४४६ १७०० ३१०१
मूग ००८ ६५०० ७७७७
उडीद ०४९ ४८०० ६२००
मका ११८ १६०० २२०१
-----