केडगावच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक दौंडच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडगावच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक 
दौंडच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक
केडगावच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक दौंडच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक

केडगावच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक दौंडच्या उपबाजारात तुरीची १९० क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड , ता. २८ : केडगाव उपबाजारात (ता. दौंड) नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे. तुरीची १९० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ६००० तर कमाल ६६०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभावात वाढ आहे. दौंड मुख्य बाजार व केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव तेजीत आहेत. केडगाव उपबाजारात कांद्याची १९२५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० तर कमाल २३०० रूपये असा बाजारभाव मिळाला. लिंबाच्या १८० डागांची आवक झाली असून त्यास प्रतिडाग किमान १०० तर कमाल २५० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची १८५० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल १५० रूपये दर मिळाला आहे.

कोथिंबिरीची १८४३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ६८१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ६०० रुपये असा बाजारभाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ४४३ २३०० ३३००
ज्वारी १४२ ३००० ४०००
बाजरी २५९ १९०१ ३१००
हरभरा ०३० ३८५० ४६०१
उदीड ०४९ ५००० ६०००
मका ०६१ १९५० २२५१

भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो-०७५, वांगी-२००, दोडका-२५०, भेंडी-४००, कार्ली-३००, हिरवी मिरची-४००, गवार-९००, भोपळा-०७५, काकडी-३००, शिमला मिरची-३५०, कोबी-०५०.
------
काकडी व मिरचीच्या दरात वाढ
दौंड तालुक्यात काकडीची ३३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान २०० तर कमाल ३०० रुपये बाजारभाव मिळाला. हिरव्या मिरचीची ८३ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान २०० तर कमाल ४०० रुपये बाजारभाव मिळाला. शिमला मिरचीची ६२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलो करिता किमान २०० तर कमाल ३५० रुपये बाजारभाव मिळाला.