दौंड खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व
दौंड खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

दौंड खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

sakal_logo
By

दौंड, ता. २९ : येथील दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पॅनेलच्या १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी संघावरील निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.


उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने १७ पैकी १४ जागा बिनविरोध झाल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी दिली.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे :-
संस्था गट : कासुर्डी- सदानंद वामन दोरगे, खामगाव- विजय पंढरीनाथ नागवडे, केडगाव- ज्ञानेश्वर साहेबराव शेळके, पारगाव- नानासाहेब गुलाबराव जेधे, नानगाव- विश्वास राजाराम भोसले, दौंड- जयवंत रामचंद्र गिरमकर, रावणगाव- गजानन नारायण गुणवरे.
वैयक्तीक प्रतिनिधी गट : प्रेमनाथ बबनराव दिवेकर, पुरुषोत्तम बाळासाहेब हंबीर.
महिला प्रतिनिधी : सविता अप्पासाहेब ताडगे, नंदा दत्तात्रेय ताकवणे.
अनुसूचित जाती-जमातीतील प्रतिनिधी : विकास अनिल कांबळे.
इतर मागास वर्ग प्रतिनिधी : संपत मारुती शेलार.
विमुक्त जाती प्रतिनिधी : आश्रू सोमा डूबे.

संस्था गटातील पिंपळगाव, वरवंड व पाटस गटातील तीन जागांसाठी निवडणूक होणार असून त्याकरिता सात उमेदवार रिंगणात आले आहेत.