स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून दीड लाखांची बॅग लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून दीड लाखांची बॅग लंपास
स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून दीड लाखांची बॅग लंपास

स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून दीड लाखांची बॅग लंपास

sakal_logo
By

दौंड, ता. २९ : दौंड शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून ग्राहकाची १ लाख ६० हजार रुपयांची बॅग लंपास करण्यात आली आहे. शाखेच्या आतून बॅग चोरीस गेल्याने ग्राहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
दौंड पोलिसांनी आज (ता. २९) याबाबत माहिती दिली. काळूराम अर्जुन गोरे (रा. वायरलेस फाटा, गिरीम, ता. दौंड) यांनी याबाबत फिर्याद दिली. बुधवारी (ता. २८) दुपारी काळूराम गोरे यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून रक्कम काढून त्यांच्याकडील हॅण्डबॅग मध्ये ठेवली होती. बॅगेतून रोख १ लाख ६० हजार रुपये, बॅंक पासबुक, विविध बॅंकांचे कोरे धनादेश, आधार कार्ड, शंभर रुपयांचा मुद्रांक, पॅनकार्ड, आदी कागदपत्रे होती. रक्कम काढल्यानंतर ते बॅंक कर्मचाऱ्याकडे एटीएम कार्ड व धनादेश पुस्तिकेसंबंधी विचारणा करीत असताना अज्ञाताने त्यांची हॅण्डबॅग लंपास केली. दौंड पोलिस ठाण्यात फिर्यादीनुसार अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी बॅंकेच्या शाखेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रीकरणाच्या आधारे चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रीकरण अस्पष्ट असल्याचे आढळून आले.