
दौंड येथे चार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
दौंड, ता. ३० : शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक पद्धतीने रिक्षा आणि मालवाहतूक करणारी वाहने उभी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी एका दिवसात चार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. शहरातील नगर मोरी परिसर, दौंड-कुरकुंभ महामार्ग एसटी बस थांबा, डॉ. भंगाळे हॅास्पिटल परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता. २९) ही कारवाई केली. यामध्ये वाहनचालक युसूफ अकबर तांबोळी (वय ५८, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर), अक्षय गोरख कठाळे (वय २४, रा. तांदूळवाडी, ता. बारामती), नीलेश चंद्रकांत सरक (वय २९, रा. शालीमार चौक, दौंड) व राहुल सुरेश शितोळे (वय ३८, रा. कुरकुंभ, ता. दौंड) यांच्याविरुद्ध रहदारीस अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहनचालकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.