
दौंडमध्ये ज्वारीची २८१ क्विंटल आवक
दौंड, ता. १५ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात ज्वारीची एकूण २८१ क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान २५०० तर कमाल ४६५० रुपये बाजारभाव मिळाला आहे.
दौंड बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाच्या आवक व बाजारभावात वाढ आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ३५११ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० तर कमाल १३०० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ७०० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल ३०० रुपये दर मिळाला आहे.
तालुक्यात कोथिंबिरीची १३२१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४२५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० व कमाल ८०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो-१२५, वांगी-२००, दोडका-४००, भेंडी-६००, कार्ली-२८०, हिरवी मिरची-५००, गवार-१०००, भोपळा-५०, काकडी-२५०, शिमला मिरची-५००, कोबी-०३०.
------
लिंबाच्या दरात वाढ....
दौंड तालुक्यात लिंबाच्या बाजारभावात वाढ झाली आहे. तालुक्यात लिंबाची १२० डाग आवक असून प्रतवारीनुसार किमान ४५१ व कमाल ९९० रुपये प्रति डाग असा भाव मिळाला आहे. मागील आठवड्यात लिंबाची ११५ डागांची आवक होऊन त्यास किमान ३५१ व कमाल ७७१ रुपये प्रति डाग असा भाव मिळाला होता. लिंबाचा एका डाग वीस किलो वजनाचा असून त्यामध्ये साधारणपणे ४५० ते ५२५ लिंबू असतात.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रू.)
गहू २६५ २१०० ३१११
बाजरी २९६ २००० ३३००
हरभरा ०२१ ३८५१ ४६००
उडीद ०१० ४००० ५५००
मूग ००७ ४५०० ६०००
मका ०१२ १९०० २२००
तूर ०३२ ६००० ६९००