ऑनलाइन जुगारप्रकरणी 
दौंडमध्ये तिघांवर गुन्हा

ऑनलाइन जुगारप्रकरणी दौंडमध्ये तिघांवर गुन्हा

दौंड, ता. १६ : मोबाईल अॅप्लीकेशनच्या साह्याने दौंड शहरातील कुरकुंभ मोरीजवळ सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, कुरकुंभ मोरीतून हुतात्मा चौकाकडे जाताना डावीकडील प्रकाश हॅाटेलच्या भिंतीला एका शेडमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर पोलिस पथकाने बुधवारी (ता. १५) छापा टाकला. या अड्ड्यावर दर बारा सेकंदाला जुगाराची नवी फेरी असल्याने तरुण वर्गाची तेथे गर्दी होती. सदर जुगार अड्डा विकी अण्णासाहेब जगताप (रा. भीमनगर, दौंड) हा चालवत होता व तेथे अशोक दिनकर पवार (वय २४, रा. पुस, ता. आंबाजोगाई, जि. बीड, सध्या रा. प्रकाश हॉटेल, दौंड) आणि बालाजी भाऊ कांबळे (रा. निगडी, पुणे) हे काम करत होते. पोलिस नाईक शरद वारे यांच्या फिर्यादीनुसार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रोख रक्कम, संगणक संच, जुगाराचे साहित्य, असा एकूण एकतीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com