
दौंडमध्ये गव्हाची ४७८ क्विंटल आवक
दौंड, ता. २२ : दौंड तालुक्यात गव्हाची एकूण ४७८ क्विंटल आवक झाली असून त्यास किमान २१०० तर कमाल ३२२५ रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात गव्हाची २६५ क्विंटल आवक होऊन त्यास किमान २१०० तर कमाल ३१११ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुक्यात लिंबाची ७५ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ५८० व कमाल १५५० रुपये प्रति डाग असा भाव मिळाला आहे. लिंबाचा एका डाग वीस किलो वजनाचा असून त्यामध्ये साधारणपणे ४५० ते ५२५ लिंबू असतात. सध्या उन्हाचा चटका जाणवत असल्याने लिंबाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभाव वाढ आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे तर कांद्याची ६१५१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० तर कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ६८० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १००; तर कमाल २०० रुपये दर मिळाला आहे.
तालुक्यात कोथिंबिरीची १४,०८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये , तर कमाल ५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४८१० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो-१२५, वांगी-१५०, दोडका-४५०, भेंडी-५००, कार्ली-३००, हिरवी मिरची-५००, गवार-१०००, भोपळा-१००, काकडी-२५०, शिमला मिरची-५००, कोबी-०५०.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रू.)
ज्वारी ५९२ ३००० ४५२५
बाजरी २०१ २००० ३३००
हरभरा ०१८ ३८०० ४७००
उडीद ०११ ३००० ५५००
मका ०२१ २००० २२००
तूर ०२२ ६००० ७४००