
दौंडमधील पाच जणांवर वीज चोरीप्रकरणी गुन्हा
दौंड, ता. २२ : दौंड शहर व परिसरातील पाच वीजचोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. थकबाकी व अन्य कारणांमुळे कायमस्वरूपी वीजमीटर बंद केलेल्या ग्राहकांचे मीटर तपासणी करताना ही वीजचोरी उघडकीस आली.
याबाबत दौंड येथील ‘महावितरण’चे सहायक अभियंता बी. एच. देसाई यांनी माहिती दिली की, वीजमीटर बंद असताना मुख्य वीजवाहिनीवरून थेट चोरून वीजजोड घेणारे प्रकाश रमेश मोरे (रा. सिटी गोल्डन अपार्टमेंट, समर्थनगर, लिंगाळी, ता. दौंड), हसीना इब्राहिम शेख (रा. शालीमार चौक, दौंड), अर्जुन रामचंद्र माने ( रा. हनुमान मंदिराजवळ, बालाजीनगर, लिंगाळी), मोहमद मेहबूब सय्यद (रा. रमाईनगर, बारामती चाळ, दौंड) व सुधाकर मारुती लोंढे (रा. जगदाळे वस्ती, लिंगाळी) यांच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घरगुती व व्यावसायिक कारणांसाठी एकूण २५७३ युनिट वीज चोरण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.