Mon, June 5, 2023

दौंडमधील चौघांविरुद्ध
शिवीगाळप्रकरणी गुन्हा
दौंडमधील चौघांविरुद्ध शिवीगाळप्रकरणी गुन्हा
Published on : 22 February 2023, 3:16 am
दौंड, ता. २२ : दौंड शहरात तरुणाला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हॅाटेलचालकासह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, शहरातील मीरा सोसायटीपुढील भावना हॅाटेल येथे आनंद लक्ष्मण सदाफुले (वय २३, रा. जनता विद्यालय जवळ, दौंड) हा तरुण २० फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता भाजी पार्सल आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी ओंकार जगताप या परिचिताशी बोलताना दोघांमध्ये जयंतीवरील चर्चेनंतर शाब्दिक वाद झाला व त्यानंतर आनंद सदाफुले यास चौघांनी मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी हॅाटेलचालक संजय जगताप याच्यासह ओंकार जगताप, हर्षवर्धन जगताप व निखिल बागल (चौघे रा. दौंड) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.