
दौंडमध्ये ज्वारीची ३७२ क्विंटल आवक
दौंड, ता. १ : दौंड तालुक्यात ज्वारीची एकूण ३७२ क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान २७०० तर कमाल ४६५० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची ५९२ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ३००० तर कमाल ४५२५ रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची ३५११ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० तर कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ८५० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान १०० ; तर कमाल २०० रुपये दर मिळाला आहे.
तालुक्यात कोथिंबिरीची १६७३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० रुपये, तर कमाल ५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५८५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो-३००, वांगी-२००, दोडका-५००, भेंडी-६००, कार्ली-३००, हिरवी मिरची -४७०, गवार-९००, भोपळा-१००, काकडी-२००, शिमला मिरची-४००, कोबी-०३५.
------
लिंबाच्या दरात वाढ
दौंड तालुक्यात लिंबाची ७१ डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ८०० व कमाल १७०० रुपये प्रति डाग असा भाव मिळाला आहे. मागील आठवड्यात लिंबाची ७५ डागांची आवक होऊन त्यास किमान ५८० व कमाल १५५० रुपये प्रति डाग असा भाव मिळाला होता.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ६०३ २००० २७५०
ज्वारी ३७२ २७०० ४६५०
बाजरी २४९ १८०० ३१००
हरभरा ०४० ३८५१ ४६५१
उडीद ०१८ ४००० ६००१
मका ००७ १८०० २१५१
तूर ०५४ ७००० ७५००