लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाचे आमिष दाखवून 
तरुणीवर बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By

दौंड, ता. ९ : दौंड शहरात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यासह जातिवाचक उल्लेख करून अपमानित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक तरुणासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीच्या फिर्यादीनुसार अतुल वामनराव कुतवळ व पार्वतीबाई वामनराव कुतवळ (दोघे रा. धुमाळ वस्ती, आलेगाव, ता. दौंड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील एका पोलिस भरतीपूर्व खासगी प्रशिक्षण वर्गात अतुल याची संबंधित तरुणीशी ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून अतुल याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध पालघर, आलेगाव, उरुळी कांचन येथील लॅाजमध्ये शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, अतुल याचा साखरपुडा ठरल्याचे माहीत झाल्यानंतर सदर तरुणी व तिचे कुटुंबीय आलेगाव येथे गेले होते. तेथे अतुल व पार्वतीबाई कुतवळ यांनी जातिवाचक उल्लेख करून अपमान करण्यासह मागासवर्गीय समाजाची असल्याकारणाने लग्न करू शकत नाही, असे सांगून तरुणीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.