सायकलपटू वधवा यांचा दौंड शहरामध्ये सत्कार

सायकलपटू वधवा यांचा दौंड शहरामध्ये सत्कार

दौंड, ता. १५ : ''''सायकलचा प्रवास पर्यावरणपूरक असून, सायकलचा वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. यामुळे सायकलचा वापर करावा,'''' असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नगर येथील सायकलपटू जस्मितसिंग वधवा यांनी केले आहे.
श्रीनगर ते कन्याकुमारी हे ३६८० किलोमीटर अंतर पूर्ण केल्यावर कन्याकुमारी येथून वधवा दौंड शहरात दाखल झाले. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वधवा यांचा दौंड मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॅा. महेंद्र मुनोत, व्यापारी पृथ्वीराज मुनोत यांच्या हस्ते व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी श्रीनगर येथील लाल चौकाचे तापमान उणे एक अंश सेल्सिअस असताना सायकल यात्रेला सुरूवात करण्यात आली. अकरा राज्यांमधून मार्गक्रमण करीत त्यांनी साडेतेरा दिवसात कन्याकुमारी गाठले तेव्हा तेथील तापमान ४५ अंश सेल्सिअस होते. सायकल यात्रेच्या निमित्ताने निधी संकलन करून आणि नगर येथील ` घर घर लंगर सेवे`च्या माध्यमातून किमान १०० गरजू विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून देण्याचा मानस आहे, अशी माहिती वधवा यांनी यावेळी दिली.
----
02252

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com