
दौंडमध्ये ज्वारीची २४६ क्विंटल आवक दौंडमध्ये ज्वारीची २४६ क्विंटल आवक
दौंड, ता. १५ : दौंड तालुक्यात ज्वारीची एकूण २४६ क्विंटल आवक झाली आहे. त्यास किमान ३००० तर कमाल ४६५० रुपये बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात ज्वारीची ४२१ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ३००० तर कमाल ४१०० रुपये बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात नवीन गव्हाची ५९४ क्विंटल आवक झाली आहे. केडगाव येथे कांद्याची ४२३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ०३०० तर कमाल १४०० रुपये असा बाजारभाव मिळाला. फ्लॉवरची ६३० गोणी आवक होऊन त्यास प्रतिगोणी किमान २००; तर कमाल ४०० रुपये भाव मिळाला आहे. तालुक्यात लिंबाची ५० डाग आवक झाली असून प्रतवारीनुसार किमान ८११ व कमाल २१५१ रुपये प्रति डाग, असा भाव मिळाला आहे.
तालुक्यात कोथिंबिरीची १८०३० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १०० रुपये, तर कमाल ४०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ५२९० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० व कमाल ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - २००, वांगी - २००, दोडका - ३८०, भेंडी - ४००, कार्ली - ३००, हिरवी मिरची - ५५०, गवार - १०००, भोपळा - ०७०, काकडी - १५०, शिमला मिरची - ४००, कोबी - ४०.
------
कलिंगड व खरबुजाची आवक वाढली
दौंड मुख्य बाजारात कलिंगडची ४४० क्रेट आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ४० तर कमाल ७० रुपये दर मिळाला. तर खरबुजाची ५५० क्रेट आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २०० रुपये दर मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रू.)
गहू १०३० २०५० २६५१
ज्वारी ०२४६ ३००० ४६५०
बाजरी ०२०४ २००० ३२००
हरभरा ०१४२ ४००० ४७५०
उडीद ०००६ ४००० ५८००
मका ००११ २००० २२००
तूर ००२० ६५०० ७२९०