मसनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मसनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास जगताप
मसनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास जगताप

मसनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास जगताप

sakal_logo
By

दौंड, ता. २१ : मसनेरवाडी (ता. दौंड) येथील मसनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी हौसाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.

सोसायटीचे अध्यक्ष आबा येडे व उपाध्यक्षा गौरी वाबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने दौंड येथील सहकार भवनमध्ये निवडणूक घेण्यात आली. विलास जगताप आणि हौसाबाई चव्हाण यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाकरिता प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर झाले.

दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, दौंड बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ जगदाळे, दौंड सोसायटीचे अध्यक्ष सुहास जगदाळे, लिंगाळीचे माजी उपसरपंच जालिंदर जगदाळे, बाळासाहेब लोंढे, संस्था सचिव राजेंद्र मदने, आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एन. टी. राठोड यांनी काम पाहिले.