Fri, June 9, 2023

दौंड शहरातून मोटारीची चोरी
दौंड शहरातून मोटारीची चोरी
Published on : 24 March 2023, 12:53 pm
दौंड, ता. २४ : दौंड शहरातील ओमशांती नगर येथील इमारतीच्या वाहनतळातून एक मोटार चोरीस गेली आहे. याबाबत दौंड पोलिसांनी शुक्रवारी (ता. २४) माहिती दिली की, नामदेव साहेबराव जगताप यांची मारुती सुझुकी कंपनीची वॅगन आर मोटार चोरीला गेली आहे. मध्यरात्री साडेतीन वाजता चंदेरी रंगाची ही कार वाहनतळातून चोरीस गेली. याबाबत अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दौंड शहर व परिसरातून दुचाकी वाहनांची चोरीचे प्रमाण वाढलेले असताना शहरात मोटार चोरीचा प्रकार घडला आहे.