वीज दरवाढ रद्द करण्याची
दौंडमध्ये आपकडून मागणी

वीज दरवाढ रद्द करण्याची दौंडमध्ये आपकडून मागणी

दौंड, ता. ४ : दौंड शहरात वीज दरवाढ रद्द करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सोमवारी (ता. ३) महसूल अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. वीज दरवाढ रद्द करणे, विजेवरील अधिभार रद्द करणे, वीज कंपन्यांचे भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्याकडून लेखापरीक्षण करणे, वीजग्राहकांना चोवीस तास वीजपुरवठा करणे, शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा करून थकबाकी माफ करणे, आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. पक्षाचे पदाधिकारी रवींद्र जाधव, नीना जोसेफ, शशिकांत वंटे, रूपेंद्र जैन व मोहन सोनटक्के या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com