दौंडच्या प्रशासकीय इमारतीतून लिपिकाच्या दुचाकीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडच्या प्रशासकीय इमारतीतून
लिपिकाच्या दुचाकीची चोरी
दौंडच्या प्रशासकीय इमारतीतून लिपिकाच्या दुचाकीची चोरी

दौंडच्या प्रशासकीय इमारतीतून लिपिकाच्या दुचाकीची चोरी

sakal_logo
By

दौंड, ता. २५ : दौंड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधून लिपिकाची दुचाकी चोरीस गेली. शासकीय सुटीच्या दिवशी ही चोरी झाली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी मंगळवारी (ता. २५) माहिती दिली की, रविवारी (ता. २३) पुनर्वसन विभागातील लिपिक भानुदास येडे यांनी सकाळी साडेनऊ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात दुचाकी लावली होती. हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी सायंकाळी साडेसहा वाजता चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
इमारतीच्या दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही दुचाकी चोरीस गेली. या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधून यापूर्वी चंदनाचे झाड, नायब तहसीलदारांचे लॅपटॅाप, मोबाईल संचासह वाळूचोरी प्रकरणांमध्ये जप्त केलेले ट्रक, टायर, लोखंडी बोटी, सक्शन यंत्र, आदी चोरीस गेले आहे. परंतु, अद्यापपर्यंत एकाही चोरीचा छडा लावण्यात दौंड पोलिसांना यश आलेले नाही.