दौंड येथे अभियंत्यावर चाकूने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड येथे अभियंत्यावर चाकूने हल्ला
दौंड येथे अभियंत्यावर चाकूने हल्ला

दौंड येथे अभियंत्यावर चाकूने हल्ला

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड शहरात दुचाकीवरील दोन चोरट्यांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने चाकूने केलेल्या हल्ल्यात स्थापत्य अभियंता सुदैवाने बचावला. या घटनेबाबत दौंड पोलिसांनी रविवारी (ता. ७) माहिती दिली. रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ते हुतात्मा चौक या रस्त्यावरून शनिवारी (ता. ६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्थापत्य अभियंता सौरभ संतोषकुमार भंडारी हे पायी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर दोघांनी चाकूने हल्ला केला. विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सौरभ यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. सौरभ याने हा प्रयत्न हाणून पाडताच एका चोरट्याने दुधारी चाकू उगारून सौरभ यांच्यावर वार केला. परंतु त्यांनी तो चुकवला. झटापटीत सौरभ यांनी चोरट्यांची दुचाकी धरून ठेवल्याने चोरट्याच्या हातातील चाकू खाली पडल्यानंतर एक चोरटा रेल्वे डिझेल पॅाइंटच्या तर दुसरा हुतात्मा चौकाच्या दिशेने पळाला. या झटापटीत सौरभ यांच्या हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत. हा हल्ला झाला त्या ठिकाणी एक महिला रस्त्याच्या कडेलाच गांजा विकत होती. दरम्यान, या रस्त्यावर रेल्वे स्थानक आणि शहरातील गर्दुल्ल्यांचा कायम वावर असतो.