दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील गोहत्या करणाऱ्या 
टोळीवर तडीपारीची कारवाई
दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई

दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई

sakal_logo
By

दौंड, ता. ८ : दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई केली.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती दिली की, अश्पाक ऊर्फ लाला कासम कुरेशी (वय ४२, रा. खाटीक गल्ली, दौंड) याने स्वत:ची एक टोळी तयार करून त्यांच्या माध्यमातून सातत्याने गोमांस आणि गोवंश मांसाची वाहतूक व विक्री सुरू ठेवली होती. तसेच, टोळीचा म्होरक्या म्हणून त्याने स्वत:ची व टोळीची दहशत निर्माण केली होती. दौंड पोलिस व पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेळोवेळी टोळीतील सदस्यांवर कारवाई केली. तरीदेखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनात फरक न पडल्याने निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी या टोळी विरुद्ध तडीपार करण्यासंदर्भातचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना सादर केला.
प्रस्तावानुसार टोळीचा म्होरक्या अश्पाक ऊर्फ लाला कासम कुरेशी (वय ४२) याच्यासह आसिफ कासम कुरेशी (वय ४१), वाजीद सादिक कुरेशी (वय २८), कय्यूम शब्बीर कुरेशी (वय ३५), बाब्या ऊर्फ इम्रान इब्राहिम कुरेशी (वय ३५), इद्रिस आबिद कुरेशी (वय ४०) व तन्वीर इस्माईल कुरेशी (वय २३, सर्व रा. कुरेशी मोहल्ला, खाटीक गल्ली, दौंड) यांना ६ मेपासून एका वर्षाकरिता पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस हद्दीसह नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुका हद्दीतून टोळीला तडीपार केले.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उप अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भाऊसाहेब पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, उप निरीक्षक सतीश राऊत, हवालदार महेश बनकर, पोलिस नाईक शरद वारे, कॉन्स्टेबल सागर गलांडे व योगेश गोलांडे यांनी ही कारवाई केली आहे.