दौंडमध्ये आवक घटल्याने कोथिंबीर महागली

दौंडमध्ये आवक घटल्याने कोथिंबीर महागली

दौंड, ता. १८ : दौंड तालुक्यात आवक घटल्याने कोथिंबिरीच्या बाजारभावात वाढ झाली आहे. कोथिंबिरीची ९८४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० तर कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कोथिंबिरीची १८२५५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ३०० रुपये, तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला होता.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व बाजारभाव स्थिर आहे. बाजार समितीचे संचालक व केडगाव येथील आडतदार संपतराव निंबाळकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने केडगाव उपबाजारात मंगळवारी लिलाव बंद ठेवण्यात आले होते. मेथीची १०५० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ५०० व कमाल १००० रुपये असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कलिंगडची ६८० क्रेट आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १२० रुपये दर मिळाला. खरबुजाची ९३० क्रेट आवक झाली आहे. त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ८० तर कमाल २७० रुपये दर मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ३५१ २०२५ २५००
ज्वारी ००४ ३३०० ४६००
बाजरी ०२९ २००० २८५१
हरभरा ०१४ ४००० ४६००
मका ०२४ १६५० २२००

गवार व कोबी स्वस्त .
दौंड मुख्य बाजारात गवारीची ८० क्विंटल आवक झाली आहे. त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ५०० रुपये भार मिळाला. मागील आठवड्यात गवारीची ७७ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रति दहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ६०० रुपये दर मिळाला होता. कोबीची ३८० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल ९० रुपये दर मिळाला. मागील आठवड्यात कोबीची ४३५ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ७० तर कमाल १०० रुपये दर मिळाला होता.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com