अनोळखींनी दिलेली लिफ्ट 
महिलेला पडली महागात!

अनोळखींनी दिलेली लिफ्ट महिलेला पडली महागात!

दौंड, ता. २४ : दौंड-पाटस रस्त्यावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेचे १ लाख २० हजार रुपये मूल्य असलेले मिनी गंठण हातचलाखीने काढून घेण्यात आले. अनोळखी वाहनातील दोन महिला व चालकाने संगनमताने ही चोरी केली.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, शीला आबासाहेब पवार (वय ५६, रा. सोनवडी, ता. दौंड) या शहरातील नगर मोरी येथे दौंड येथून वरवंड (ता. दौंड) येथे जाण्याकरिता बस थांब्यावर थांबल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातील चालकाने, ‘कोठे जायचे आहे?’ असे त्यांना विचारून, ‘आम्ही चौफुला येथे चाललो असून, तुम्हाला वरवंडला सोडतो,’ असे सांगितले.
या वाहनात त्या पुढील बाजूला बसल्या. वाहनाच्या पुढील बाजूस चालकासह एक महिला आणि पाठीमागील बाजूस दोन महिला, एका पुरुष व दोन लहान मुले होती. वाहन दौंड-पाटस रस्त्याने जात असताना वाहनातील एका महिलेने सीटबेल्ट लावण्याचा आग्रह धरला. तर, मागील महिलेने शीला पवार यांचे केस तोंडावर येत असल्याचे सांगत केस पुढे घेण्यास सांगितले. दरम्यान, पावणेबारा वाजता बेटवाडी (ता. दौंड) येथे चालकाने वाहन थांबवून शीला पवार यांना पाठीमागे बसण्यास सांगितले. त्या खाली उतरताच चालकाने वाहन पुढे दामटले व वेगाने निघून गेला. शीला पवार यांना आपल्या गळ्यातील सोन्याचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दाखल केली.
शीला पवार यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात दोन अज्ञात महिला व एक पुरूषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com